श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्साहाला आरंभ

भजनी दिंड्या शेगावात दाखल, विविध कार्यक्रमांची रेलचेल
श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्साहाला आरंभ

दिपक सुरोसे

शेगाव - Shegaon

श्री संत गजानन महाराजांचा (Shri Sant Gajanan Maharaj) ११२ वा पुण्यतिथी उत्सव २८ ऑगस्ट रोजी परंपरेनुसार संतनगरीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

तर दि.१ सष्टेबर रोजी हभप श्री भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळानिमित्त कीर्तन होणार आहे. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास २८ ऑगस्टला आरंभ होवून १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. यागाची पुर्णाहूती व अवभृत स्नान श्रीचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्‍वस्त व विश्‍वस्त मंडळ व ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल तर दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्‍वासह परिक्रमा निघेल.

श्री गजानन सेवा समिती व्दारा श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन मुरारका जिन अग्रसेन चौक येथे ३१ व १ रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्रीपर्यंत अविरत महाप्रसाद वाटप सुरु राहील. शेगाव, नागपूर, अकोटचा भक्त परिवार श्री गजानन सेवा समितीव्दारे दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सेवा अर्पीत करीत असतो.
श्री गजानन सेवा समिती

सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. रात्री ८ ते १० हभप श्रीभरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. २ ऑगस्ट रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व तोरण लावण्यात येवून भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन होत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत.

भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे.

तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे.

भक्तांना कोणताही त्रास होवू नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com