Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedमुक्त विद्यापीठाच्या एमबीए प्रवेशाला सुरुवात

मुक्त विद्यापीठाच्या एमबीए प्रवेशाला सुरुवात

औरंगाबाद – Aurangabad

नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) सरस्वती भुवन कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या केंद्रात एमबीए अभ्यासक्रमाच्या (MBA course) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन एंटरन्स टेस्ट (सीईटी) उत्तीर्ण करणे आवश्यक असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ५०० रूपये शुल्क भरून १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत परीक्षेला बसता येईल.

- Advertisement -

एमबीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ऑनलाईन लिंकचा वापर करून स्वतंत्ररित्या प्रवेश अर्ज आणि प्रवेश शुल्क भरावे लागेल. त्यानंतर अभ्यासकेंद्राला संपर्क साधून केंद्राचे शुल्क भरणे अनिवार्य आहे. हे शुल्क भरल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही. प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला पदवी परीक्षेत किमान ५० टक्के तर राखीव वर्गातील विद्यार्थ्याला किमान ४५ टक्के गुण आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २ हप्त्यात फीस भरण्याचीही सुविधा आहे. मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही लवकरात लवकर प्रवेश घेण्याची प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अभ्यासकेंद्रावर पूर्वतयारी (इंग्रजी व मराठी), बीए, बीकॉम (इंग्रजी व मराठी), पत्रकारिता पदवी व पदविका, गांधी विचार दर्शन, मानवी हक्क प्रमाणपत्र, समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र (सीपीसीटी) या अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याच आवाहन प्राचार्य आणि केंद्रप्रमुख डॉ. मकरंद पैठणकर, केंद्र संयोजक प्रा.अशोक सुरडकर, केंद्र सहायक शिवराज दहिवाल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. सुरडकर-९८८१४६७१४७, दहिवाल- ९८९०६८७३०७ आणि मनोज-७९७२०५५९६३ यांना संपर्क साधावा..

- Advertisment -

ताज्या बातम्या