फटाके फोडताना काळजी घ्या!

महावितरणचे आवाहन
फटाके फोडताना काळजी घ्या!

औरंगाबाद - aurangabad

घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्याची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होतो. घर किंवा इमारतीच्या अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा. प्रकाशमान दिवाळीचा (diwali) आनंद घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या (distribution) वतीने करण्यात आले आहे.

आकाशदिव्यांची तसेच माळेची उघडी वायर चांगल्या दर्जाच्या टेपने सुरक्षित करून घ्यावे. घरगुती अंतरावर वातीचे दिवे लावावेत. विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.सार्वजनिक वीज यंत्रणा तसेच घरगुती उपकरणांपासून दूर अंतरावर फटाके फोडून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे.


महावितरणची लघुदाब व उच्च दाबाच्या वीज वाहिल्या, रोहित्र, फिडर पिलर इ. यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीज यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

रोहित्र किंवा फिडर पिलरच्या जवळ टाकलेल्या कचऱ्याजवळ फटाके फोडू नये. कचरा पेटवून देणे टाळावे. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा त्यापासून धोका होईल, असे प्रामुख्याने रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. वीज यंत्रणेला आग लागल्यास किंवा धोका झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. गोंदावले यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com