Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedमलेरिया कशामुळे होतो? जाणून घ्या सविस्तर या आजाराविषयी...

मलेरिया कशामुळे होतो? जाणून घ्या सविस्तर या आजाराविषयी…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मलेरिया (maleria) म्हणजेच हिवताप हा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस (Anopheles) जातीचा बाधित डास चावल्यामुळे होतो. डासांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपैकी मलेरिया सर्वात धोकादायक मानला जातो. मलेरिया कसा होतो?, मलेरियाचे प्रकार (types of maleria), लक्षणे (Symptoms), उपचाराविषयी जाणून घ्या…

- Advertisement -

कसा होतो मलेरिया

बाधित डास जेव्हा चावतो तेव्हा ‘प्लाजमोडियम परजीवी’ हे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर परजीवी रक्तामधून त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात. परजीवी रक्तात मिसळून त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींना बाधित करतात.

मलेरियाचे प्रकार

  • प्लाज्मोडियम वायवॅक्स

  • ‎प्लाज्मोडियम ओवेल

  • ‎प्लाज्मोडियम फैल्सिपैरम

  • प्लाज्मोडियम मलेरिया

लक्षणे

  • थंडी वाजून ताप येणे

  • ‎थांबून-थांबून अधिक ताप येणे

  • ‎डोकेदुखी

  • मळमळ व उलट्या

  • पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे

  • नाडीची गती जलद होणे

  • सांध्यांमध्ये वेदना होणे

  • ‎अंगदुखी, शरीरात वेदना होणे

मलेरियावरील उपचार

मलेरियावर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे आवश्यक असते. मलेरियावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.

उपाययोजना

  • डासांपासून बचाव करावा.

  • डासनाशक साधनांचा वापर करावा.

  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

  • घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.

  • मलेरियाचे डास हे संध्याकाळी चावत असतात. याकाळात डासनाशक साधने वापरावीत.

  • घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.

  • घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत होईल.

  • परिसरात मलेरियाची साथ आलेली असल्यास अधिक काळजी घ्यावी.

  • थांबून थांबून ताप येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि रक्त परिक्षण करुन घ्यावे.

तुम्हाला जर मलेरियाची लक्षणे आढळून आली असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय करून आजार वाढण्याची भीती असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या