सावधान! मराठवाड्यात बर्ड फ्लू दाखल 

परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्या मृत्युमुखी 
सावधान! मराठवाड्यात बर्ड फ्लू दाखल 

औरंगाबाद - Aurangabad

जगभरात कोरोना संसर्गकाळ सुरू असतानाच मराठवाड्यात अचानकपणे बर्ड फ्लूनेसुद्धा डोके वर काढले आहे. परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळं मृत्यू झाल्यानंतर आता इतर जिल्ह्यातही या रोगाचा शिरकाव झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसात परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील ८०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे समोर आले असून अन्य ठिकाणी या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनानं तातडीने हालचाली सुरू केल्या असून मुरुंबा या गावासह एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या परिसरात कोणी जाऊ नये, अशा प्रकारच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.

देशातील सात राज्यात या रोगाचा संसर्ग झाल्याचा आढळून आले होते. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आता यात महाराष्ट्राचा देखील समावेश झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com