बर्‍हाणपूर पोलिस अधीक्षकांना करोना
अन्य

बर्‍हाणपूर पोलिस अधीक्षकांना करोना

पोलिस विभागात खळबळ

Ramsing Pardeshi

बर्‍हाणपूर - Barhanpur

जिल्ह्यामध्ये कोराना रुग्णांची वाढत असून शहरासह ग्रामीण भागातही करोना पाय पसरतोय. मिळालेल्या माहितीनुसार बर्‍हाणपूर येथील जिल्हा पोलिस अधिक्षक राहुलकुमार लोढा करोना संक्रमित झाले असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांमध्ये घबराट पसरली असून आरोग्य विभागातर्फे पोलिस अधिक्षकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पोलिस विभागातील जे सहकारी पोलिस अधिक्षकांच्या संपर्कात होते त्या सर्वांची माहिती घेवून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार कालच पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकार्‍यांची मिटींग घेतली होती. त्यात बरेच अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com