नवी दिल्ली- New Delhi

अपेट्रा पॅराडीगम या अमेरिकन कंपनीने नवी सोलर पॉवर्ड इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारची बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होणार आहे आणि एका चार्ज मध्ये ही कार चक्क 1600 किमीचा प्रवास करू शकणार आहे. म्हणजे एकदा कार खरेदीचा खर्च केला की दिल्ली ते मुंबई प्रवास अजिबात इंधन खर्च न करता येणार आहे.

आज जगभरातील बहुतेक सर्व ऑॅटो कंपन्या फ्युअललेस व इलेक्ट्रिक मोबिलिटी यावर काम करत आहेत. भविष्यात अश्या वाहनांना पर्याय राहणार नाही आणि वाहने सर्वाना परवडतील अश्या शिवाय सर्वाना सोयीच्या ठरतील अश्या विविध मॉडेल्स मध्ये बनविणे हे या कंपन्यांना मोठे आव्हान आहे. त्यामुळे अपेट्रा पॅराडीगमने सादर केलेली ही कार कुतूहलाचा विषय ठरली आहे.

सूर्यप्रकाश सहज शोषला जाईल आणि बॅटरी चार्ज होईल या प्रकारे या कारचे डिझाईन बनविले गेले आहे. ही तीन चाकी कार दोन सिटर आहे. एखाद्या छोट्या जेट फ्लाईट प्रमाणे ती दिसते. एका वर्षात 11000 मैल म्हणजे 17700 किमी ही कार चालविता येईल. तिच्या बॅटरीची क्षमता 25.0 केडब्ल्यूएच पासून 100.0 केडब्ल्यूएच अशी आहे. ग्राहकांना कुठलाही पॅक घेता येणार आहे.

ग्राहकांना 100 केडब्ल्यूएच फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टीम मॉडेल वा 150 केडब्ल्यूएच ऑॅल व्हील ड्राईव्ह पॉवर ट्रेन मॉडेल असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ही कार 0 ते 100 किमीचा वेग 5 सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी 177 किमी. अमेरिकन बाजारात तिची किंमत 25999 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात 19.10 लाख इतकी आहे.