नायलॉन दोरा निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 
नायलॉन दोरा निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नायलॉन दोरा निर्मिती, विक्री व वापर यावर बंदी घालत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने तसेच वन्य पशु पक्षांचे जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com