ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलेव्हरीसंदर्भात कंपनीची जबरदस्त घोषणा

Ola Scooter
Ola Scooter

ओला सीईओ भाविश अग्रवाल यांनी (CEO Bhavish Aggarwal) ‘Gaddi nikal chuki’ या कॅप्शनसह ट्विट करत Ola S1 आणि S1 Pro ची डिलीव्हरी कधी होणार याबाबत खुलासा केला आहे. Ola S1 स्कूटरची 15 डिसेंबरपासून डिलीव्हरी सुरू होणार आहे. 8सप्टेंबर हा World EV Day असल्याने या दिवसांपासून या स्कूटरची बुकींग सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपयांमध्ये ओला Ola Scooter ची बुकिंग करता येणार होती.

ओलाने आपल्या ग्राहकांसाठी Ola Scooter ची परचेस विंडो सुरु केली आहे. ओला स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये असणार आहे.

ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील. ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील हाय चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल असा दावा कंपनीने केला आहे. ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. याची मॅक्सिमम स्पीड रेंज 115 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रो ची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल. राज्यानुसार याच्या किमतीत बदल होत आहे.

Ola Electric ने S1 स्कूटरसाठी EMI 2,999 विक्री सुरु केली आहे. तर S1 proसाठी EMI 3,199 रुपये असणार आहे. IDFC फर्स्ट बँक, HDFC व टाटा कॅपिटलसह अनेक प्रमुख बँकांकडून कर्ज काढता येणार आहे. स्कूटरचा इंश्योरेंस ओला व ओला इलेक्ट्रिक ऍपच्या माध्यमातून करता येणार आहे. कंपनीचा इंश्योरेंस पार्टनर ICICI लोम्बार्ड आहे. Ola Electric नुसार स्कूटरची डिलीवरी ऑक्टोंबर 2021 पासून सुरु होणार आहे. कंपनी टेस्ट राइड देणार आहे. टेस्ट राइडनंतर ऑर्डर रद्द करण्याचा ऑप्शन दिले आहे.Ola इलेक्ट्रिक स्कूटर S1 वेरिएंट एका वेळेस पुर्ण चार्ज केल्यावर 121 किलोमीटर तर S1 Pro वेरिएंट सिंगल चार्ज केल्यावर 181 किलोमीटर चलणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com