Maruti Alto
Maruti Alto
ऑटाे

Maruti Alto : करोना काळातही विक्रीचा रेकॉर्ड

भारतात ४० लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुति सुझुकीने Maruti Suzuki आपल्या छोट्या कारद्वारे एक नवा रेकॉर्ड New Record केला आहे. मारुति सुझुकीच्या लोकप्रिय ऑॅल्टो Alto कारने विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. मारुति सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, ऑॅल्टोची विक्री ४० लाख यूनिटसवर गेली असून यासह ऑॅल्टो भारतात ४० लाखांहून अधिक गाड्यांची विक्री करणारी पहिली कार ठरली आहे.

मारुतिची ही छोटी कार २० वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. जी १६ वर्षांपासून भारतात टॉप-सेलिंग म्हणजेच सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुति ऑॅल्टोने २००८ मध्ये १० लाख यूनिटस विक्रीचा आकडा पार केला होता. २०१२ मध्ये २० लाख यूनिटस आणि २०१६ मध्ये ३० लाख यूनिटसपर्यंत विक्री पोहचली होती. मायलेज आणि परवडणार्‍या किंमतीमुळे या कारने बाजारात आपलं नाव स्थिर ठेवलं आहे.

BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी पहिली कार

latest crash and pedestrian safety standardsmen BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी ही देशातील पहिली एन्ट्री लेवल कार ठरली आहे. मारुतिने दिलेल्या माहितीनुसार, ’७६ टक्के ग्राहक त्यांची पहिली कार म्हणून ऑॅल्टोची निवड करतात. ऑॅल्टो भारतीय ग्राहकांच्या पसंतीची कार असून, किंमत परवडणारी असण्याबरोबरच, सोयीस्करही आहे’. मारुति सुझुकी ऑॅल्टो पेट्रोलच्या ६ आणि सीएनजीच्या २ वेरिएन्टसमध्ये येते. याची एक्स शोरुम किंमत २.९४ लाख ते ४.३६ लाखांपर्यंत येते. ८०० सीसी इंजिन असणारी ही गाडी BS6 मानक आणि ३ सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. यात ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सही आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com