एमजी मोटर्सची Hector Dual Delight भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्टे

एमजी मोटर्सने नुकतीच Hector Pluse लॉन्च केली होती.
एमजी मोटर्सची Hector Dual Delight भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्टे

एमजी मोटर्स MG Motors ने भारतात एसयूवी हेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट लॉन्च केली आहे. जी भारतीय बाजारात Hector Dual Delight नावाने उतरवली आहे.

नव्या ड्युल टोन कलर ऑप्शनमध्ये कंपनीची फक्त रेंज-टॉपिंग शार्प ट्रिम मध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत मोनो-टोन वेरियंट पेक्षा 20 हजार रुपयांनी अधिक आहे. एमजी मोटर्स हेक्टरचे ड्युल-टोन वेरियंटवर दोन कलर ऑप्शन दिले आहेत.

त्यामध्ये कॅन्डी व्हाइट विद स्टार्री ब्लॅक आणि ग्लेज रेड विद स्टार्री ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. नवी कलर स्किम सोडून हेक्टर ड्युल डिलाइटचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन मोनो-टोन शार्प वेरियंट सारखेच दिले आहेत.

या वेरियंटमध्ये 25 हून अधिक स्टँडर्स सुरक्षा फिचर्स दिले आहेत. त्यामध्ये 50+ कनेक्टेड कार सुविधा, वॉईस असिस्टंट, 26.4 सेमी टचस्क्रिन इंन्फोन्टेंनमेंट सिस्टिम तसेच पॅनारोमिक सनरुफसह सुरक्षा सुविधेसाठी 360 डिग्री कॅमेरा हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर, एबीएससह ईबीडी, ब्रेक असिस्ट आणि ट्रॅन्जेक्शन कंट्रोल सिस्टिमचा समावेश आहे.

इंजिन ऑप्शनसाठी हेक्टरच्या ड्युल टोन ट्रिममध्ये 3 इंजिनचे ऑप्शन मिळणार आहे. त्यामध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, 1.5 लीटर पेट्रोल आणि 2.0 लीटर टर्बो-डिझलेचा समावेश आहे. ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड डीसीटीचे ऑप्शन दिले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com