बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 'मराठवाडा बांबू क्लस्टर'ची स्थापना

शेतकऱ्यांना बांबू पिकाकडे वळवण्यासाठी प्रयत्न
बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 'मराठवाडा बांबू क्लस्टर'ची स्थापना

औरंगाबाद- Aurangabad

देशात बांबू उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्सादन दिले जात आहे. केंद्र सरकारने 'अटल बांबू मिशन'अंतर्गत विविध योजना उपलब्ध झाल्या आहेत.

बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयटी महाविद्यालयाने 'मराठवाडा बांबू क्लस्टर'ची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना बांबू पिकाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी जिल्हानिहाय प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मराठवाड्यात बांबू पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एमआयटी महाविद्यालयाने 'मराठवाडा बांबू क्लस्टर' स्थापन करून बांबू लागवड व उद्योगासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत महाविद्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी डॉ. यज्ञवीर कवडे, रोजगार हमी योजना महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, शकुंतला लोमटे, उद्योजक बी. एल. जाहेर पाटील, रमेश म्हैसेकर, राम पवार, सुभाष लोमटे, श्याम बोरावके, डॉ. संतोष भोसले, सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा भागात उपविभागीय अधिकारी असताना बांबू लागवड आणि उद्योग क्षेत्रात भरपूर काम केले. मराठवाड्यात बांबू क्लस्टरची स्थापना करण्यासाठी महसूल विभागाचे सहकार्य मिळेल, असे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com