औरंगाबाद - Aurangabad

ग्रेटा थनबर्ग टूलकीट प्रकरणात बीडचा अभियंताा शंतनू मुळक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. शंतनुला दहा दिवसाचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे आदेश न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत.

टूलकिट प्रकरणी दिशा रवी हिला बंगळुरू येथून अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील बीड येथील रहिवासी शंतनू मुळक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरट काढले होते. टूल कीट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूचे असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली न्यायालयात जामीनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळण्यासाठी शंतनूने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनअर्ज सादर केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान जामीन अर्जाच्या गुणवत्तेवर सुनावणी न होता शंतनूला दहा दिवसाचा दिलासा मिळाला आहे.

दहा दिवसासाठी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाचे मंजूर केल्याचे त्याचे वकील सतेज जाधव यांनी सांगितले. या निर्णयामुळे शंतनूला दहा दिवस दिल्ली पोलिसांना अटक करता येणार नाही.