Audi RS Q-8 भारतात लॉन्च

जाणून घ्या वैशिष्टे !
Audi RS Q-8 भारतात लॉन्च

जगभरात प्रसिद्ध जर्मनीच्या ऑडी कंपनीने गुरुवारी भारतात आपली नवीन एसयूव्ही Audi RS Q-8 लॉन्च केली आहे.

या Audi RS Q-8 ची किंमत २.०७ कोटी रुपयांपासून सुरू होते. याबाबतची माहिती ऑडी इंडियाने दिली आहे. ऑडी इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, "Audi RS Q-8 मध्ये टर्बो 4-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून 600 हॉर्स पॉवरची शक्ती इंजिन प्रदान करते. ज्यामुळे ही कार अवघ्या चार सेकंदात शून्यापासून १०० किलोमीटर प्रति तास वेग सहजपणे पकडते."

तसेच ही कार म्हणजे एक ऑल-इन-वन मॉडेल आहे. आम्हाला विश्वास आहे की, Audi RS Q-8 ही लक्झरी स्पोर्ट्स कारची आवड असणाऱ्या व्यक्तींना नक्कीच आकर्षित करेल.

या कारमध्ये 48 वोल्टची मुख्य ऑन-बोर्ड इलेक्ट्रिकल सिस्टम असलेली एक सौम्य हायब्रीड सिस्टम (MHEV) आहे. त्यात मागणीनुसार सिलिंडर(COD) तंत्रज्ञान देखील आहे. जे कमी विजेची गरज असताना सिलेंडर बंद देखील करते. कारमध्ये आठ स्टँडर्ड स्पीड गिअरबॉक्स आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com