नाशकात आजपासून ‘ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पो’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजीत चार दिवसीय ‘ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे’ उद्घाटन आज (दि.25) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते ठक्कर डोम येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री, खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ट्रान्सपोर्ट इंड्रस्टीत पन्नास वर्षे सेवा देणारे चालक किसन पवार, मेहबूब पठाण या वाहकांनाही उद्घाटनाचा मान दिला जाईल, अशी माहिती जिल्हा ट्रान्सपोर्ट अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली.

ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पोमध्ये सायकलपासून ते जेसीबी व ट्रेलर प्रदर्शनात पाहायला मिळेल. गुरुवारी उद्घाटनानंतर सांस्कृतिक आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध राज्यातील कलांचे सादरीकरण केले जाईल. शुक्रवारी (दि.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते ‘कोशिशे कामयाबी की’ पुरस्कार वितरण सोहळा केला जाईल. पन्नास वर्षांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणारे वाहक व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल.

दुपारी तीन वाजता ट्रकचालक आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी ‘होम मिनिस्टर’ या गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.27) दुपारी 2 वाजता ऑर्केस्ट्रा लिट्ल वंडर तर सायंकाळी 6 वाजता ‘चलती का नाम गाडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि.28) दुपारी 3 वाजता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सपोचा समारोप होईल. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीसह नाशिककरांनी एक्स्पोला हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

फूड फेस्टिव्हल आकर्षण प्रदर्शनाला देशभरातील नामवंत हस्तींसोबत मोठ्या संख्येने नागरिक भेट देणार आहे. त्यामुळे एक्स्पोत देशभरातील व्यंजनाचा सहभाग असलेले ‘एक देश अनेक व्यंजन’ या फूड फेस्टिवल मुख्य आकर्षण असणार आहे. चारही दिवस हे फूड फेस्टिवल सुरू राहणार असून नाशिककरांना या फूड फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यात असलेल्या नाविन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी करावयाचे बदल तसेच सारथी सुविधा केंद्राची निर्मिती हा एक्स्पोचा मुख्य उद्देश आहे.

– राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *