Friday, May 10, 2024
HomeUncategorizedशुभ संकेत : मराठवाड्यात कोरोनाची लाट ओसरली

शुभ संकेत : मराठवाड्यात कोरोनाची लाट ओसरली

औरंगाबाद – Aurangabad

स्थानिक प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या असून विभागात करोना रुग्णांवर उपचारासाठी ५५ हजार ७३४ खाटांचे नियोजन आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून मराठवाड्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे यातील तब्बल ५१ हजार ८१७ खाटा (९३ टक्के) रिकाम्या आहेत. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात…

- Advertisement -

कोरोना रुग्णांचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करून ते पॉझिटिव्ह असतील तर त्यांची लक्षणे पाहून त्यांना कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येते. गेल्या सात महिन्यांपासून कोरोना रुग्णांसाठी त्या-त्या जिल्हाप्रशासनाने उपाययोजना केली होती.

त्यानुसार विभागात उभारलेले ४२४ कोविड केअर सेंटर, ६३ कोविड हॉस्पीटलमध्ये तसेच १२५ कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५५ हजार ७३४ खाटांची सोय करण्यात आली होती. आता यातील तब्बल ५१ हजार ८१७ खाटा रिकाम्या आहेत. यामध्ये यामध्ये ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर असलेल्या खाटांचाही समावेश आहे. करोनाची लाट आता औरंगाबाद तसेच विभागाच्या इतर भागातही ओसरत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. सप्टेंबरमध्ये एकाच दिवसामध्ये दोन हजारांच्याचाही पार जाणारा कोरोनाबाधितांची संख्या आता तीनशेच्या घरात आली आहे. गेल्या चोवीस तासात विभागातील एकाही जिल्ह्यात दोनशेवर रुग्ण आढळले नाही. शिवाय गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने कमी झाले आहेत.

जिल्हानिहाय रुग्णसंख्या

औरंगाबाद- ७१९

नांदेड- ४५६

परभणी- २२३

लातूर- ६३८

जालना- ५३७

बीड- ७४८

हिंगोली- ७९

उस्मानाबाद- ५८२

एकूण ॲक्टिव्ह रुग्ण – ३९१७

- Advertisment -

ताज्या बातम्या