Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद

औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद

औरंगाबाद – aurangabad

औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीची तोडफोड करण्याची धमकी मिळाल्याने येत्या पाच दिवसांसाठी कबरीवर कोणालाही जाऊ दिले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या पाच दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून मोठा सशस्त्र (police) पोलीस बल त्याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

खुलताबाद (Khultabad) येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक (Tourist) व इतर नागरिकांना बघण्यासाठी बंद करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. गेल्या आठवड्यात औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन एमआयएमचे नेते आ.अकबरुद्दीन ओवेसी (mla Akbaruddin Owaisi) यांनी पुष्प अर्पण केल्याने देशभरात वाद उफळला आहे. दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगजेबाची कबर तोडण्याची धमकी दिल्याने गेल्या आठवड्यापासून खुलताबादेत तणावाचे वातावरण आहे. कबरीच्या सुरक्षेसाठी खुलताबादेत शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते.

त्यांची पोलीस प्रशासनासह दर्गा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी समजूत घालून वातावरण शांत केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मंगळवारपासून औरंगजेबाची कबर व दर्गा परिसरातील मुख्य रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून कबर परिसरात सशस्त्र पहारेकरी नेमले आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी कबर परिसराची पाहणी करून सुरक्षेसंबंधी आढावा घेतला होता.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील ही कबर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक आणि नागरिकांना पाहण्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या राजेश वाकलेकर यांनी दिली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून औरंगजेबाची कबर पर्यटक व नागरिकांना पाहण्यासाठी पुढील ५ दिवस बंद ठेवण्याचा तिर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. परिस्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या