औरंगाबादकरांची म्युच्युअल फंडात १२ हजार कोटींची गुंतवणूक!

मनीष मेहता यांची माहिती
औरंगाबादकरांची म्युच्युअल फंडात १२ हजार कोटींची गुंतवणूक!

औरंगाबाद - aurangabad

शेअर्सच्या तुलनेत कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांत सुमारे १२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात ९ हजार कोटींची इक्विटी, तर सव्वाचार लाख एसआयपी आहेत, असे कोटक म्युच्यअल फंडचे सेल्स हेड मनीष मेहता यांनी सांगितले.

यावर्षी १ लाख २० हजार नवीन एसआयपी सुरू करण्यात आल्या आहेत. कोटक म्युच्युअलकडे यातील ६ टक्‍के गुंतवणूकदार आहेत. दरम्यान, कोटक म्युच्युअल फंडकडे २९ लाखांहून अधिक खाती आहेत. ज्यामार्फत गुंतवणूकदार नियमितपणे त्यांच्या म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक करत असतात. कोटक फ्लेक्सीकॅप फंड, कोटक ब्ल्यू चिप, कोटक इमर्जिंग इक्विटी त्याचप्रमाणे कोटक इक्विटी अपॉर्च्यूनिटीजसारखी उत्पादने कोटक म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांत लोकप्रिय आहेत, अशी माहिती मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेहता म्हणाले की, भारतीय म्युच्युअल फंड उद्योग कोरोनानंतर पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. युवापिढी म्युच्युअल फंड परिघातील एसआयपीसारख्या नवीन गुंतवणूक पर्यायांच्या शोधात आहे. कोटक म्युच्युअल फंडमध्ये, एसआयपीकरिता सक्रियपणे आरेखन करत असून, मागील काही वर्षांत लोकप्रियता मिळवली आहे.

गुंतवणूकदारांना आमच्या कोणत्याही चालू योजनेची निवड करून एसआयपी मार्गाने गुंतवणुकीची सुरुवात करणे शक्‍य आहे. कोटक म्युच्युअल फंड सध्या आरओएममध्ये ७ ठिकाणी आहे. आमची मजबूत विक्री आणि गुंतवणूकदार संबंध टीम बँका, राष्ट्रीय वितरण आणि म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) मधील वितरण भागीदारांसोबत जवळून काम करते. आरओएमच्या एकूण एयूएममध्ये औरंगाबाद बाजारपेठेचा वाटा ५.२७% पेक्षा जास्त आहे. औरंगाबादच्या एकूण एयूएममध्ये (३० सप्टेंबर २०२२ पर्यंत) इक्विटी गुंतवणुकीचा वाटा जवळपास ७५% आहे. गुंतवणूकदार एसआयपीचा वापर गुंतवणुकीचे साधन म्हणून करण्यात पारंगत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com