औरंगाबादकरांना आला लसीकरणाचा कंटाळा!

35 हजारावर लस महापालिकेकडे पडून
औरंगाबादकरांना आला लसीकरणाचा कंटाळा!

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लस घेणे, हाच एकमेव पर्याय आहे. मात्र शहरात दुसरी लाट ओसरताच लस घेणार्‍यांचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे 45 वर्षावरील नागरिकांसाठीचा सुमारे 35 हजार लसींचा साठा महापालिकेकडे पडून आहे. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे आता लसीची सक्‍ती करण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना दंड आकारला आणार आहे, असा इशारा पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी दिला.

16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आजवर शहरातील 3 लाख 35 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. तर सुमारे 60 हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पालिकेने शहरात 115 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करत जम्बो मोहीम हाती घेतली. मात्र अचानक लसींचा पुरवठा कमी झाल्याने यातील अनेक केंद्र बंद करावी लागली.

मागील महिन्याभरापासून 45 वर्षीय वरील नागरिकांसाठीच लस राखून ठेवल्या आहेत. लस घेणार्‍यांची संख्या वाढावी, यासाठी दिव्यांग, ड्राईव इन यासह विविध प्रयोग प्रशासनाने राबवले. मात्र तरी देखील लसीकरणाचे प्रमाण वाढत नसल्यामुळे आता पालिका लसीकरणाची सक्ती करण्याचे नियोजन करीत आहे. 45 वर्षीय ज्या नागरिकांनी लस घेतली नाही, त्यांना दंड आकरण्याचा देखील विचार सुरु असल्याचे यापूर्वीच आयुक्‍त पांडेय यांनी जाहीर केले आहे. 21 जूननंतर शासन आदेशान्वये 45 वर्षाच्या खालील नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com