औरंगाबादकारांचा विश्वास खासगी रुग्णालयांवरच!

सरकारी बेड्स रिकामे
औरंगाबादकारांचा विश्वास खासगी रुग्णालयांवरच!

औरंगाबाद - Aurangabad

मागील आठवडाभरापासून (corona) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यात जमा झाल्याचे चित्र आहे. ग्रामीणपेक्षा शहरात रोज आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या आता दोन ते चार वरच येवून ठेपली आहे. मागील आठवडाभरापासून मिनी घाटी अर्थातच जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल झालेला नाही. मात्र दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांतच अधिक कोरोना रुग्ण भरती होत असल्याचे चित्र प्राप्‍त आकडेवारीवरून समोर आले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका कमी असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. मात्र ती केव्हा येईल, याचा निश्‍चित अंदाज अद्याप बांधला जाणे कठीण आहे. यापूर्वी तज्ज्ञांनी ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान तिसर्‍या लाटेचे भाकीत केले होते. मात्र आता ही लाट नोव्हेंबर-डिसेंबर किंवा त्यानंतर येवू शकते, असे सांगितले जात आहे. या पार्श्‍वभूमीवरच कोरोनाच्या दृष्टीने राज्यात मुंबई, पुणेनंतर हॉटस्पॉट ठरलेल्या औरंगाबादेत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा झाली आहे.

विशेषतः ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाची संसर्गाची स्थिती आता दिलासादायक बनली आहे. पालिकेकडून प्राप्‍त आकडेवारीनुसार सध्या शहरातील विविध रुग्णाधलयांत 70 कोरोना रुणांवर उपचारसुरू आहेत. विशेष म्हणजे, यात मिनी घाटीत मागील आठवडाभरापासून उपचारासाठी एकही रुग्ण दाखल झालेला नाही. तर पालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयातही रूग्णांची संख्या घटली आहे. मेल्ट्रॉनमध्ये सध्या केवळ 9 रुग्ण आहेत. तर घाटीत 8 रुग्ण असून खासगी रुग्णालयात तब्बल 28 रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये अर्थात घरीच 25 रुग्ण उपचार घेत आहेत. यावरून सरकारी रुग्णालयांवरील विश्‍वास कमी झाल्याचे दिसून येत आहे. सरकारी बेड्स रिकामे असतानाही रुग्ण खासगीतच उपचार घेणे पसंत करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com