'वसंतोत्सवा'त औरंगाबादकर चिंब!

रसिकांकडून भरभरून दाद
'वसंतोत्सवा'त औरंगाबादकर चिंब!

औरंगाबाद - aurangabad

कधी आक्रमक, कधी अलवार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक पं. वसंतराव देशपांडे (Singer Vasantrao Deshpande) यांची गाणी, त्यांचे सूर, त्यांच्या आठवणी जागवणारा आगळावेगळा वसंतोत्सव (Spring Festival) रसिकांनी अनुभवला.

आपल्या चतुरस्र गायकीचा अलौकिक वारसा मागे ठेवून गेलेले लोकप्रिय गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव एक स्मरण हा खास कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला होता. वसंतरावांचे नातू व आजच्या पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्या गायकीतून वसंतरावांची गाणी नव्याने रसिकांसमोर सादर झाली.

वसंतराव हे एक वेगळेच रसायन होते. संगीतातील या (Eklavya) एकलव्याचे अनेक द्रोणाचार्य (Dronacharya) होते. कोणत्याही एका संगीत घराण्याच्या चौकटीत न अडकता त्यांनी असद अली, सुरेश बाबू, पंडित दीनानाथ मंगेशकर, बेगम अख्तर अशा अनेक दिग्गजांना गुरू मानून संगीताची दीक्षा घेतली. प्रत्येक गायकीचे अंतरंग समजून घेऊन वसंतरावांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली होती. वसंतरावांची जडणघडण, त्यांची जिद्द, अभ्यास अशा अनेक आठवणी आपल्या ओघवत्या निवेदनातून प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी रसिकांसमोर उलगडल्या. वसंतरावांच्या आठवणी या त्यांच्या गाण्यांशिवाय सुरू होऊ शकत नाही. या मैफिलीची सुरुवातही रवी मी.. या वसंतरावांच्या गाण्याने झाली. हा वसंत संवाद त्यांची गाणी गाऊन राहुल देशपांडे यांनी सुरू केला.

बगळय़ांची माळ फुले', 'घेई छंद मकरंद', 'लागी कलेजवा कटार' सारखी गाजलेली गाणी राहुल देशपांडे यांनी सादर केली. त्यांना वैभव जोशी, निखिल फाटक (तबला), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), प्रसाद जोशी (पखवाज),रोहन वणगे (विविध तालवाद्य), आदित्य ओक यांनी साद संगत दिली.

एमआयटी वर्ल्ड पिस युनिवर्सिटी (MIT World Peace University) या कार्यक्रमाचे सहआयोजक तर लोकमान्य को. ऑप. मल्टीपर्पज सोसायटी लि., विलो पंप, ओर्लिकॉन बाल्झर्स, एंड्रेस- हौसर या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com