Friday, April 26, 2024
HomeUncategorizedधरण उशाला अन्‌ कोरड घशाला ; औरंगाबादचा पाणीपुरवठा विस्कळीतच!

धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ; औरंगाबादचा पाणीपुरवठा विस्कळीतच!

औरंगाबाद – aurangabad

अवघ्या ५५ किलोमीटरवर (Jayakwadi Dam) जायकवाडी धरण असूनही औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा (Water supply) गेल्या अनेक वर्षांपासून विस्कळीतच असून सर्वपक्षीय आंदोलनाने आता (Municipal Corporation) महापालिका चांगलीच कामाला लागल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

औरंगाबाद महापालिकेने आता पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. एक्सप्रेस जलवाहिनीचा उपअभियंता अशोक पद्ये यांच्याकडे असलेला पदभार तातडीने उपअभियंता के.एम. फालक यांच्याकडे दिला आहे. त्यासोबतच पाईपलाईन, व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पाणी वाटपाचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ब नागरिकांनी पाण्यासाठी पालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. शहरातील पाणी प्रश्नाची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाचे प्रधानसचिव संजीव जैस्वाल यांना शहरात पाठवून परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजनांबद्दल कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना केली. त्यानुसार जैस्वाल यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना राबव्यात, हर्सूल तलावातील पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा उपायुक्त संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, समन्वयक एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी नक्षत्रवाडी ते सिडको दरम्यान एक्सप्रेस जलवाहिनी टाकलेली आहे. या जलबाहिनीतून सिडको-हडकोला ५५ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. दिवसभरात ५० ते ५२ एमएलडी पाणी दिले जाते. या जलवाहिनीचा पदभार उपअभियंता अशोक पद्मे यांच्याकडे सोपवलेला होता. पद्मे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आता हा पदभार उपअभियंता के. एम. फालक यांच्याकडे सोपवला असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

सिडको-हडकोसह विद्यापीठ परिसर, जुने शहर, हर्सूल, चिकलठाणा, गारखेडा, रेल्वेस्टेशन, उल्कानगरी, रेल्वेस्टेशन परिसर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. सिडको उपअभियंता कार्यालयासमोर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या