Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद : सव्वापाच लाख गुरांचे लसीकरण

औरंगाबाद : सव्वापाच लाख गुरांचे लसीकरण

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात ५ लक्ष ३४ हजार ३९४ पशुधन असून त्यापैकी आजपर्यंत ५ लक्ष १८ हजार ९२३ गुरांचे ९७ % लम्पी प्रतिबंधक लसीकरण (Vaccination against Lumpy) करण्यात आले आहे. जिल्हयात आतापर्यंत औषधोपचारातून १४०४ गुरे बरी झाली आहेत. तर ४५१ गुरांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून तसेच पशुसंवर्धन विभागाने देखील गुरांचे लसीकरण (Vaccination of cattle) केले.

- Advertisement -

जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी तातडीने लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या रोगाचा जिल्हयात संसंर्ग रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.

ज्या पशुपालकांची गुरे लम्पीने बाधीत आहेत, त्या बाधित जनावरांना उपचारासाठी येणाऱ्या पशु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे व आपली गुरे लसीकरण व औषधोपचाराद्वारे लम्पी रोगमुक्त करावी.तसेच ज्या पशुपालकांनी अदयापही आपल्या गुरांना लम्पी प्रतिबंधक लस दिलेली नाही त्यांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे व आजारी जनावरांना पोष्टीक चारा, खनिज मिश्रण रोग प्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी नियमीतपणे द्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लम्पी नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन विभागाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील १०७ गावांत आढळलेल्या १८५२ बाधित गुरांपैकी १४०४ गुरे पूर्णतः बरी झाली आहे. तर ४५१ गुरांवर उपचार सुरू आहेत. पशुपालकांना २४ तास आकस्मिक प्रसंगी सेवाही दिली जात आहे. जिल्ह्यातील एकूण १०९ गायवर्गीय जनावरे मृत झाली असून त्यापैकी ५१ पशुपालकांना अर्थसहाय्य जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने देण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या