बनावट धनादेशाद्वारे बँकेची फसवणूक

यूनियन बँक अधिकारी अडचणीत  
बनावट धनादेशाद्वारे बँकेची फसवणूक

औरंगाबाद - aurangabad

बनावट कागदपत्रे सादर करून एकाने यूनियन बँक ऑफ इंडियाच्या (Union Bank of India) न्यू उस्मानपुरा शाखेत बँक खाते उघडले. त्या खात्यात एनटीआर युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स, विजयवाडा, आंध्र प्रदेश यांचा ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा बनावट धनादेश टाकला. या धनादेशावरील सहीची खात्री केल्यानंतर बँकेने वटविला. पैसे खात्यात जमा होताच त्याने सर्व पैसे काढून घेत बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात (police) गुन्हा नोंदवला आहे.

शुभम प्रकाश भिवसाने (रा.प्लॅट नं.२४, स्मृती अपार्टमेंट, बन्सीलानगर, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाचे विधि अधिकारी कपील बिलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुभम भिवसाने याने न्यू उस्मानपुरा येथील बँकेत खाते उघडण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. आधार कार्डवर मुंबईतील पत्ता असल्यामुळे त्याने घरमालकासोबतचा भाडे करारनामा, वीज बिल सादर केल्यामुळे खाते उघडले. त्याने १० ऑगस्ट रोजी यूनियन बँक ऑफ इंडिया, विजयवाडा शाखेतील एनटीआर युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स संस्थेचा ९ लाख ९८ हजार २०० रुपयांचा बनावट धनादेश बँकेत जमा केला. बँक अधिकाऱ्यांनी धनादेशावरील सहीची शहानिशा केल्यानंतर वटवत भिवसाने याच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट केले.

दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी विजयवाडा येथील बँकेच्या शाखेच्या व्यवस्थापकाने हेल्थ विद्यापीठाचा वटवलेला धनादेश हा संबंधित विद्यापीठाने दिलेला नसून, तो बनावट असल्याचे उस्मानपुऱ्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे धक्का बसलेल्या बँक अधिकाऱ्यांनी भिवसाने याने दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली.

तेव्हा त्या पत्त्यावरतो कधीच राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने भाडे करारनामा, वीज बिल बनावट दिल्याचेही उघड झाले. भिवसाने याने बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी निरीक्षक संतोष पाटील यांनी गुन्हा नोंदवून घेत सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांच्याकडे अधिक तपासासाठी सोपवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com