मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादही काढणार 'ग्लोबर टेंडर'! 

मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादही काढणार 'ग्लोबर टेंडर'! 

लसींची मोठी खरेदी शक्य 

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबर टेंडर काढून लस खरेदी करण्याचे ठरवले आहे. यात मुंबई पालिकेला मिळालेला प्रतिसाद पाहून औरंगाबाद पालिका देखील ग्लोबल टेंडर काढण्याचा विचार करेल, असे संकेत महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.

औरंगाबाद शहरातील एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. ते झाल्याशिवाय शहर कोरोनापासून सुरक्षित होणार नाही. त्यामुळे आपल्याला लसीकरणावर भर द्यावा लागणार असल्याचे आयुक्‍त पांडेय यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले क, लसीकरणासाठी पालिकेने मेगा मोहीम आखली. मात्र शासनाकडून लसींचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे.

सतरा लाखांपैकी आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद पालिका देखल लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा विचार करणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी पांडेय यांना सोमवारी विचारला, तेव्हा त्यांन स्पष्ट केले की, मुंबई पालिकेला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून आम्ही निर्णय घेऊ. रोज वीस हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता आहे, असे असले तरी लसींच्या उपलब्धतेवर लसीकरणाच्या मोहिमेचे नियोजन केले जात आहे. डिसेंबरपूर्वी देशात व शहरात मोठ्या प्रमाणावर लसी उपलब्ध होतील, असा विश्वास आयुक्‍तांनी व्यक्‍त केला.

मुंबईप्रमाणे ग्लोबल टेंडर काढून 14 लाख नागरिकांसाठी लस खरेदी करायचे झाल्यास त्यास किमान 25 कोटी रुपये खर्च येईल. पालिकेकडे एवढी आर्थिक तरतूद आहे का? या प्रश्‍नावर आयुक्‍त पांडेय म्हणाले की, अत्यावश्यक कामासाठी पैसा कमी पडणार नाही. पैशाची कोणतीही अडचण येणार नाही. अनावश्यक कामांसाठी मात्र पैसा उपलब्ध करुन दिला जाणार नाही. लवकर व अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे, असा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com