औरंगाबादमध्ये होणार पहिली 'मल्टी स्टोअरेज पार्किंग'

बीओटी तत्वावर बनवणार
औरंगाबादमध्ये होणार पहिली 'मल्टी स्टोअरेज पार्किंग'

औरंगाबाद - Aurangabad

जुन्या शहरातील पैठणगेट ते गुलमंडी हा नो व्हिकल (No vehicle) रस्ता म्हणून विकसीत केला जाणार आहे. त्यासाठी पैठणगेटवरील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोअरेज पार्किंग बांधली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने (Municipal Corporation) प्रकल्प सल्लागाराची (पीएमसी) नियुक्ती करण्यसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा, या तत्वानुसार (बीओटी) त्याचा विकास केला जाणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी (Aurangabad Smart City) योजनेतंर्गत शहरातील चार प्रमुख रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. या रस्त्यांच्या विकासासाठी चार अर्किटेक्ट संस्थांची नियुक्ती केलेली आहे. क्रांतीचौक ते गुलमंडी या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. पैठणगेट ते गुलमंडी हा नो व्हिकल रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता नो व्हिकल करण्यासाठी चारचाकी वाहनांकरिता पार्किगची व्यवस्था करावी लागणार आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पैठणगेट येथील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोअरेज पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही पार्किंग चारचाकी वाहनांसाठी असेल. यामध्ये वाहने उभी करून पैठणगेट ते गुलमंडी रस्त्यावर फिरता येईल.

मल्टी स्टोअरेज पार्किंगसाठी (Multi storage parking) पीएमसीची नियुक्ती करण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे. पीएमसीची निवड झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाईल. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा, या तत्वानुसार पार्किंग उभारण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे शहर अभियंता पानझडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com