Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादला मिळणार 'ऑक्सिजन निर्मिती'ची नवी ओळख!

औरंगाबादला मिळणार ‘ऑक्सिजन निर्मिती’ची नवी ओळख!

औरंगाबाद – aurangabad

मागील दहा वर्षांपासून देशभरात पीएसए (Oxygen) ऑक्सिजन जनरेटर प्लांट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अशी ओळख असणाऱ्या (Aerox technology) एअरॉक्स टेक्नॉलॉजीसचा औरंगाबादच्या (Auric City) ऑरिक सिटीमध्ये उत्पादन प्रकल्पाची सुरुवात होत आहे. त्यामुळे (Automobile) ऑटोमोबाईल, ब्रेवरेज यानंतर ऑक्सिजन निर्मितीचे शहर अशी नवी ओळख औरंगाबादला मिळणार आहे.

- Advertisement -

या नव्या उत्पादन प्रकल्पामुळे औरंगाबादसह देशभरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, असे मत एअरॉक्स टेक्नॉलॉजीस् प्रा. लि. चे संचालक संजय जैस्वाल यांनी व्यक्त केले. ते ऑरिक सिटीत एअरॉक्सचा नव्याने सुरू होत असलेल्या उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी (१३ मार्च) बोलत होते.

यावेळी जैस्वाल म्हणाले की, पीएसए ऑक्सिजन जनरेटरमध्ये एअरॉक्स हा अग्रगण्य ब्रँड म्हणून नावारूपास आला आहे. आजवर पीएम केअर फंड अंतर्गत सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटीमध्ये ६०, युनायटेड नेशनच्या चिल्ड्रन्स फंड अंतर्गत युनिसेफसाठी ३४ ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्यात आले आहेत. अनेक नामांकित शासकीय व खाजगी हॉस्पिटल व संस्थांमध्ये एअरॉक्सने ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प उभारले आहेत. औरंगाबादमध्ये २० नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारले आहेत. आजघडीला देशाच्या एकूण ऑक्सिजन निर्मितीत एकट्या एअरॉक्सचा ८ टक्के इतका वाटा आहे.

आता एअरॉक्स ऑरिक सिटीत दोन टप्प्यात स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारतोय. पहिल्या टप्प्यात ४२ हजार चौरस फूट जागेवर कच्चा उत्पादनाचा दर्जा तपासणारे तंत्रज्ञान, पाच टन क्षमता असलेली क्रेन, दर्जेदार उत्पादनासाठी तापमान व वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा आदींनी प्रकल्प सज्ज असणार आहे. या माध्यमातून पहिल्या वर्षात ५ वेंडर्स तर ३५ जणांना रोजगार मिळणार आहे. दुसऱ्या फेज ६५ ते ७० हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात येणार असून याद्वारे १५० च्या आसपास प्रत्यक्ष रोजगार मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या