औरंगाबादला मिळणार मेट्रो रेल्वेचे गिफ्ट!

लवकरच प्रस्ताव
औरंगाबादला मिळणार मेट्रो रेल्वेचे गिफ्ट!

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता येणाऱ्या काळात मेट्रोची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शहरात स्मार्ट सिटी (Smart City) डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत ऑरीक सिटी ते वाळूज एमआयडीसी (midc) भागांना मेट्रो रेल्वेने जोडण्याचा विचार मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी केला आहे.

एवढेच नाही तर मेट्रोच्या प्रस्तावाची फाईल लेखा विभागाकडून स्मार्ट सिटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मेट्रोचा खर्च हा औरंगाबाद महानगरपालिकेला परवडणार नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम केल्यास ते अधिक सोपे होईल यादृष्टीने प्रशासकांनी पीएमसीची नियुक्ती करण्यासाठी स्मार्ट सिटीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय पेट्रोलियम तथा नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी हे शहरात येणार आहेत. त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव पुरी यांच्यासमोर सादर करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात वाळूज ते ऑरीक सिटी हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागातही मेट्रोचा विचार केला तरी असे झाल्यास शहरात कुठूनही कुठे पोहोचणे अगदीच सोपे होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com