औरंगाबाद बनणार इलेक्ट्रिक व्हिकल हब

उभारली जाणार दोनशे चार्जिंग सेंटर
औरंगाबाद बनणार इलेक्ट्रिक व्हिकल हब
Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - aurangabad

(Pollution) प्रदूषणाचे वाढते प्रमाण, वातावरणात होणारा बदल याची दखल घेऊन पर्यावरण संतुलनासाठी (State Government) राज्य सरकारच्या आदेशानुसार (Municipal Corporation) महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना (Electric vehicle) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या (Charging) चार्जिंगसाठी शहरात दोनशे चार्जिंग सेंटर उभारली जाणार आहेत. त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च केला जाणार आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने (Central Government) प्रदूषणाचे वाढते प्रमाण, वातावरणात होणारा बदल त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम यावर उपाययोजना करण्याच्या अनुशंगाने (E-vehicle) ई-वाहने खरेदी करण्याची सूचना सरकारी कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांना केली आहे. ई-वाहनांमुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता निर्माण होईल, वाहनांसाठीच्या इंधनाचा खर्चदेखील कमी होईल, असे सरकारी यंत्रणांचे मत आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसाठी पाच ई-कार खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्यासाठीदेखील दहा ई-कार खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ई-कारची खरेदी आणि त्यासाठीचे चार्जिंग सेंटर याचा खर्च पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून केला जाणार आहे.

याच निधीतून शहरात दोनशे ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारली जाणार असल्याची माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. स्मार्ट सिटीचे कार्यालय, महापालिकेचे मुख्य कार्यालय, पेट्रोल पंप, मॉल, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, विविध व्यापारी संकुल या ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील, असे पांडेय यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com