धक्कादायक ; मुलाने केली वडिलांची हत्या

सतत भावाची बाजू घेत असल्याचा राग
धक्कादायक ; मुलाने केली वडिलांची हत्या

औरंगाबाद - Aurangabad

वडील नेहमी लहान भावाची बाजू घेतात आणि शेतामध्ये त्यालाच मदत करतात, या रागातून मुलानेच वडिलांचा खून केला. ही घटना मुर्शिदाबाद वाडी (तालुका फुलंब्री) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. मोठ्या मुलाने कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परसराम अप्पा पवार (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रोहिदास (वय ३२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. परसराम हे चौका येथे नशा करण्यासाठी गेले होते. तेथून त्यांना आणताना रोहिदासची त्याच्या वडिलांशी झटापट झाली. त्यात ते खाली पडून डोक्यात दगड मारले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी तपास सुरू असताना संशय रोहिदासवर गेला. त्याच्या बोलण्यात एक वाक्यता नसल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणले असता. त्याने पूर्णपणे कबुली जबाब दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुगदीराज तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com