अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून

पत्नी व प्रियकर जेरबंद
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून

औरंगाबाद - aurangabad

अनैतिक संबंधाची पतीला कुणकुण लागल्याने आणि कंपनीत किंवा रस्त्यावर सतत करत असलेला अपमान सहन न आल्याने पत्नीने दारूच्या नशेत तर्रर असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने चाकूने सपासप वार करून निर्घृण खून (murder) केला. दोन दिवसांपूर्वी विजय पाटणी याचा मृतदेह धुळे-सोलापूर  (Dhule-Solapur Bypass) बायपासवर सापडला. या प्रकरणात पोलिसांनी (police) पत्नी सारिका पाटणी आणि तिचा प्रियकर सागर मधुकर आवळे यांना अटक केली आहे.

वडगाव कोल्हाटी येथील विजय पंजयकुमार पाटणी (४५) हा कंपनीतील कामगार असून त्याची पत्नी सारिका पाटणी देखील एका कंपनीत लेखापाल आहे. त्यांना एक मुलगी आहे. सारिकाचे सागर मधुकर सावळे (२५) याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. दोघांच्या संबंधात विजय हा अडसर ठरत असल्याने दोघा 'पती-पत्नीत नेहमी भांडण होत होते. त्यामुळे दोघे चार महिन्यांपासून विभक्त राहत होते. विभक्त राहत असतानाही विजय सारिकाच्या कंपनीत जाऊन तिला शिगीवाळ करीत असे. भररस्त्यावर अडवून अपमानही करत असे. या सततच्या छळास कंटाळून पत्नी सारिकाने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. एक तर सतत अपमान करतो, शिवाय प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधात अडसरही ठरत असल्याने पत्नी सारिकाने थंड डोक्याने पतीचा खून करण्याचा कट रचला.

सारिकाने मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी फिरण्याच्या बहाण्याने विजयला धुळे-सोलापूर बायपासवर नेले. त्यावेळी सागर साळवे देखील त्यांच्या मागावर होता. बायपासवर पती-पत्नी दोघांनीही मनसोक्त दारू ढोसली. पतीला नशा चढल्याचे लक्षात आल्यावर सारिकाने पर्समधील स्प्रे पतीच्या तोंडावर मारला. काही समजण्याच्या आत सागर देखील तेथे आला. सागरने विजयचे हात पकडले तर सारिकाने पतीच्या पोटात, बरगडीत आणि गळ्यावर तब्बल सहा वार केले. पती विजय मृत झाल्याचे लक्षात येताच दोघांनी विजय याचा मृतदेह एका कुपाट्यात फेकला आणि त्यांनी दुचाकीवरून तेथून पळ काढला. 

पतीच्या खुनानंतर सारिका पाटणीने दिशाभूल करण्यासाठी पती विजय संजयकुमार पाटणी हे घरातून अचानक गायब झाल्याची तक्रार एमआयडीसी बाळूज पोलीस ठाण्यात दिली. हेडकॉन्स्टेबल बावस्कर यांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली. दरम्यान, हा तपास सुरू असताना सोलापूर-धुळे बायपासवर २७ ऑक्टोबर रोजी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या अंगावर छातीवर, बरगडीवर आणि पोटात असे एकूण सहा वार करण्यात आलेले होते. 

सातारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली होती. गोरे यांना विजय पाटणी याच्या मिसिंगची माहिती मिळाली. त्यांनी पडताळणी केली असता त्यांना मिसिंग असलेला विजय हीच खून झालेली व्यक्‍ती असल्याचे समोर आले. यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के व रावसाहेब जोंधळे यांच्या पथकाने तक्रारदार सारिकाची सखोल चौकशी करताच खुनाचे बिंग फुटले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com