
औरंगाबाद - aurangabad
रिक्षाचालकांच्या विविध मागण्या आणि आरटीओची (rto) जप्ती मोहीम सुरु आहे. मात्र ही जप्ती मोहीम अन्यायकारक असल्याच्या विरोधात काही रिक्षा संघटनांतफे आजपासून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र अनेक संघटना या बंदमध्ये सहभागी नाहीत. रिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक कृती समितीने गुरुवारपासून रिक्षा बंदची हाक दिली आहे.या कृती समितीत पंधरा रिक्षा चालक-मालक संघटनांचा सहभाग असल्याचा दावा समितीचे अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी केला आहे.
गब्बर ऑशन संघटनेने मिटर कॅलीब्रेशनसाठी दोन ते तीन महिने मुदत वाढ देण्याची मागणी केली. यावेळी मकसूद अन्सारी, हफीज अली, शेख हानिफ (बब्बुभाई), विलास मगरे, रशीद महेबुब सलाहकार, सय्यद साबेर, हसन शहा, ईस्माईल राजा, सलमान पटेल, तय्यब जफर, अब्दुल कय्युम, हाफीज समद बागवान, फेरोज खान, अखिल पटेल, सय्यद ईस्माइल, अख्तर पटेल, सय्यद उजैफ आदींची उपस्थिती होती.
परिवहन अधिकाऱ्यांनी घेतली बैठक
रिक्षा बंदच्या पाः पपतक आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी रिक्षा संघटना पदाधिकार्यांची बैठक घेतली. त्यानंतर रिक्षा चालकांना मिटर कॉलिबरसाठी ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्याचे मान्य केल्यानंतर काही संघटनांनी माघार घेतल्याची माहिती छावा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश हेंडगे, रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद यांनी दिली. तर याच मागण्यांसाठी आयटक प्रणित लाल बावटा संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२) आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती आयटकचे संघटक अँड. अभय टाकसाळ यांनी दिली.
२८ मार्गावर धावणार ७० स्मार्ट बस (Smart bus)
रिक्षा चालकांचा गुरुवारपासून (ता. १) संप असल्याने स्मार्ट सिटीने गुरुवारपासून २८ मार्गावर ७० स्मार्ट बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन ३ मार्गावर ६ बसेस वाढवल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून एकूण ७० स्मार्ट बसेस या २८ मार्गावर धावणार आहे. गुरूवारपासून मार्ग क्रमांक १८ - सिडको ते रेल्वे स्टेशन, मार्ग- देवळाई चौक, बीड बायपास, मार्ग क्रमांक २१ - रेल्वे स्टेशन ते रेल्वे स्टेशन, रिंग रूट मार्गे, महावीर चौक, मध्यवर्ती बस स्थानक, हर्सूल टी पॉइंट, सिडको, क्रांती चौक, अहिल्याबाई होळकर चौक. मार्ग क्रमांक २७ - रेल्वे स्टेशन ते स्मृती बन, मार्गे क्रांती चौक, औरंगपुरा, हर्सूल टी पॉइंट या मार्गावर नवीन बस सुरू होत आहे.