मराठवाड्यातील ढाब्यावाल्यांचे 'धाबे' दणाणले!

४८२ मद्यपींना अटक व साडेसतरा लाखांचा दंड
मराठवाड्यातील ढाब्यावाल्यांचे 'धाबे' दणाणले!

औरंगाबाद - aurangabad

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) आयुक्‍त कांतीलाल उमाप व विभागीय उपआयुक्त यांच्या निर्देशान्वये मराठवाडा (Marathwada) विभागामध्ये परवानगी नसलेल्या हॉटेल, ढाब्यावर दारू पिण्यास कायद्याने बंदी असल्यामुळे विशेष मोहीम हाती घेऊन विभागातील आठ जिल्ह्यामध्ये असलेले अवैध ढाबावाल्यांची इत्यंभूत माहिती घेऊन कार्यवाहीचे नियोजन करून ढाबा मालक अवैधपणे ढाब्यावर दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणे व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे मुंबई (mumbai) दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ चे उल्लंघन करणे गुन्हा आहे.

कोविड-१९ च्या काळात अधिकृत परवाना कक्ष हॉटेल वरील निर्बंधामुळे अवैध धाब्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शासन महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. सदर धडक कार्यवाही मध्ये सर्व सामग्री (खुर्ची,टेबल ईत्यादी) जप्त करून हॉटेल, ढाबा मालक व मद्यपी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन त्वरीत न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून आरोपी यांना न्यायालयात सादर करून न्यायालयाने दोषी विरुद्ध त्वरीत द्रव्यदंडाची शिक्षा दिली आहे. या धडक मोहिमेमध्ये औरंगाबाद विभागामध्ये एकूण १०७ ढाब्यावर व ढाबामालकावर कार्यवाही करून ४८२ मद्यपीविरुद्ध कार्यवाही केली आहे व न्यायालयाने या प्रकरणी एकूण १७ लाख ४७ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.


ढाब्याविरुद्ध कार्यवाहीमध्ये प्रदीप पवार,विभागीय उपआयुक्‍त,राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक औरंगाबाद संतोष झगडे,अधीक्षक जालना पराग नवलकर,अधीक्षक बीड नितीन घुले, अधीक्षक उस्मानाबाद गणेश बारगजे, अधीक्षक नांदेड अतुल कानडे, अधीक्षक लातूर ए.डी.देशमुख,अधीक्षक परभणी व हिंगोली रविकिरण कोले व सर्व क्षेत्रीय निरीक्षक,भरारी पथक निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक,जवान यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये कायदयातील तरतूदीचे विश्लेषण कलम ६८ - जो कोणी,(॥) सामान्य पिण्याचे घर म्हणून कोणतीही जागा उघडते,ठेवते किंवा वापरते किंवा (५) सामान्य पिण्याचे घर म्हणून उघडलेल्या,ठेवलेल्या किंवा वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही जागेची काळजी, व्यवस्थापन किंवा नियंत्रण किंवा कोणत्याही प्रकारे व्यवसाय चालविण्यास मदत करते. (दोषी सिद्ध झाल्यावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु पाच वर्षापर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी कारावासाची किंवा पंचवीस हजार रुपयापेक्षा कमी नसलेल्या परंतु, पन्नास हजार रुपयापर्यंत वाढू शकेल अशा दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्हीही कलम ८४ - जो कोणी सामान्य मद्यपानाच्या घरात मद्यपान करताना आढळला किंवा तेथे मद्यपान करण्याच्या उद्देशाने आढळून आला तर दोषी आढळल्यास, दंड या उद्देशाने शिक्षा केली जाईल. जी ५००० (पाच हजार रुपये) पर्यंत असू शकते. कोणतेही मद्यपान करताना मद्यपानाचे घर तेथे मद्यपान करण्याच्या उद्देशाने असल्याचे सिद्ध होईपर्यंत, असे गृहीत धरले जाईल. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैध ठिकाणी मद्यसेवन करू नये. अवैध ठिकाणी बनावट, भेसळयुक्‍त मद्यविक्रीची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्हानिहाय वसूल करण्यात आलेला दंड


औरंगाबाद- ७५४३०००/-
बीड- १११००/-
उस्मानाबाद-१४३५००/-
जालना-१७०५००/-
नांदेड-४८०३००/-
लातूर-३९२५००/-
परभणी-६२००/-
हिंगोली-०/-

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com