Friday, April 26, 2024
HomeUncategorized'सामूहिक आत्महत्या तरी करू द्या'

‘सामूहिक आत्महत्या तरी करू द्या’

औरंगाबाद – aurangabad

शहरातील सिडको बस स्थानक (bus station) येथे मागील २४ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी ४१ टक्क्यांची वाढ केली होती. पण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची आमची प्रमुख मागणी असून मात्र यावर राज्य शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे विलिगीकरणाची मागणी मान्य न झाल्यामुळे सदरील संप मिटलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागातील एसटीचे चाक बंद पडले आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी ४१ टक्क्यांची वाढ केली पण आमची पगारवाढीची मागणीच नाही तर तुम्ही देता कशाला? एकतर राज्य शासनाने आम्हाला शासनात विलीनीकरण करावे किंवा आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया संप करणार्‍या कर्मचार्‍यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या