Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआता वाघासह बिबट्या, कोल्हा, कासव घ्या 'दत्तक'!

आता वाघासह बिबट्या, कोल्हा, कासव घ्या ‘दत्तक’!

औरंगाबाद – aurangabd

तुम्हाला जर वाघ सांभाळायची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) ‘दत्तक’ योजनेतून आपण वाघच काय बिबट्या, माकड, कोल्हा, कासव, सांबर, नीलगाय असे कितीतरी प्राणी दत्तक घेऊ शकता.

- Advertisement -

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू…

या योजनेत ज्या व्यक्तींनी, संस्थेने किंवा (Corporate companies) कॉर्पोरेट कंपन्यानी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात १४ वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव असे ३२० मोठे प्राणी आहेत. या दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे.

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी प्राणी संग्रहालयातील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी, मित्र, व्यक्ती, संस्था व कंपन्यांना दत्तक दिले जाणार आहेत. प्राणी दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या