Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद स्वच्छता सर्वेक्षणात देशात बाविसावा

औरंगाबाद स्वच्छता सर्वेक्षणात देशात बाविसावा

औरंगाबाद – aurangabad

तीन वर्षांपूर्वी ज्या शहरात कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगली पेटल्या, दगडफेक झाली, त्या औरंगाबाद शहराचा केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात देशपातळीवर २२ वा तर राज्यात सहावा क्रमांक आला आहे. मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरांनंतर स्वच्छतेत औरंगाबादचा क्रमांक लागला आहे. नागपूर, सोलापूर, अमरावतीला औरंगाबादने मागे टाकले आहे.

- Advertisement -

दहा महिन्यांपूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाने खाम नदी, नाल्याची सफाई, रस्त्यावरील धूळ पुसणारे यंत्र पाहिले. त्याआधारे गुण मिळाल्याने हे आश्चर्य घडल्याचे समोर आले. गेल्या पाच वर्षांपासून इंदूर देशात पहिला क्रमांक पटकावत आहे. या वर्षी त्यांना ६००० पैकी ५६०० गुण (औरंगाबाद ३७००) मिळाले आहे. औरंगाबादला जनसहभागाचे सर्वाधिक १५०० गुण मिळाले. इंदूरमध्ये कचरा प्रश्नावर काम करणाऱ्या बेसिक संस्थेचे उपाध्यक्ष श्रीगोपाल जगताप म्हणाले की, लोकांमध्ये जागरूकता हेच यशाचे रहस्य आहे. अगदी लहान मुलांनाही कचरा वर्गीकरण माहिती आहे. इंदूरमध्ये कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया होते.

तीन मुद्द्यांवर तपासणी

जानेवारी २०२१ मध्ये दिल्लीहून क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी स्वच्छता श्रेणी आदर्श, लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि स्थळ पाहणी या मुद्द्यांवर तपासणी केली. शहरातील विविध ठिकाणचे फोटो काढून ते दिल्लीला पाठवले. त्यावरून परीक्षण झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या