एसटी महामंडळाला रक्षाबंधन 'पावले'

तब्बल 50 लाखाचे उत्पन्न
एसटी महामंडळाला रक्षाबंधन 'पावले'

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनामुळे (corona) आर्थिक डबघाईला आलेल्या (ST Corporation) एसटी महामंडळाने रक्षा बंधनाचा (Raksha Bandhan) मुहूर्त चांगलाच लाभदायी ठरला आहे. कोरोनामुळे माल वाहतूक सुरू करून एसटीने तिजोरीत उत्पन्नाची भर टाकली आहे. दरम्यान रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे चार दिवसाच्या कालावधीत एसटी महामंडळाने आपल्या तिजोरीत सरासरी 50 लाखाचे उत्पन्न पाडून घेतले आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून एसटी महामंडळाची विविध ठिकाणी धावणारी बससेवा बंद होती. या बंदमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. दरम्यान राज्य सरकारने अनलॉक करण्याची घोषणा केल्यानंतर एसटी महामंडळाने काही मार्गावर आपली बससेवा सुरू केली. सुरू केलेल्या बससेवेला मध्यतंरीच्या काळात म्हणावा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. 40 -45 टक्यापर्यत प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र नुकत्याच झालेल्या रक्षा बंधनासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन प्रत्येक आगाराच्या प्रमुखांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनाचे सर्व आगार प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या होत्या.

या सर्व जादा बसेस 21, 22, 23 आणि 24 अशा चार दिवस विविध मार्गावर धावल्या. औरंगाबाद विभागातील जवळपास 415 एसटी बसेस या विविध मार्गावर प्रवाशांना घेऊन धावल्या. त्यांनी एक लाख 55 हजार किलोमीटर अंतर कापून एसटीच्या तिजोरीत सरासरी 50 लाखाचे उत्पन्न पाडून दिले. योग्य वेळी योग्य नियोजन केल्यामुळे एसटीला याचा फायदा झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com