Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादकरांना मिळणार मोफत बुस्टर डोस ; पाच लाख लसींचा साठा 

औरंगाबादकरांना मिळणार मोफत बुस्टर डोस ; पाच लाख लसींचा साठा 

औरंगाबाद – aurangabad

केंद्र सरकारने (Central Govt) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Corona vaccination) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Booster dose) बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या शहरातील ५ लाख नागरिकांना पालिकेच्या ४७ आरोग्य केंद्रांत बुस्टर डोस दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा होणारा तीव्र परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाला मान्यता दिली आहे. देशभरात १६ जानेबारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोना प्रतिबंधक म्हणून प्रिकॉशन डोस (बुस्टर) आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्क्स आणि ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत स्वरूपात आरोग्य केंद्रातून उपलब्ध करून दिला. ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतली त्यांना बुस्टर डोस देखील कोविशिल्ड लसीचा दिला जात आहे. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना त्याचीच लस देण्यात येत आहे. मात्र, १८ ते ५९ वयोगटातील सर्वसामान्य नागरिकांना बुस्टर डोससाठी पैसे मोजावे लागत होते.

आता केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोरोनाचा बुस्टर डोस सर्व नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासंदर्भात पालिकेचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा प्रिकॉशन डोस (बुस्टर) पालिकेच्या आरोग्य केंद्रांत देण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ४७ आरोग्य केंद्रांतून १८ ते. ५९ वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या