तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी औरंगाबाद सज्ज

दोन कोटींची औषधी खरेदी
तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी औरंगाबाद सज्ज

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाची (Corona) तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यंत्रसामुग्री आणि औषधी खरेदीला दोन कोटीचा निधी लागणार आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून द्यावा, यासाठी पालिकेने (Collector) जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

आगामी दोन महिन्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने तिसर्‍या लाटेत बालकांना धोका असल्याचे लक्षात घेऊन गरवारे कंपनीत बाल कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच एमजीएममध्ये देखील बाल कोविड रुग्णालय उभारले जात आहे. मेल्ट्रॉनमध्ये 50 खाटांची बालकांसाठी व्यवस्था देखील आहे. पालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून आठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटीपध्दतीने नियुक्ती करण्यात येत आहे. आता यंत्रसामुग्री आणि औषधी खरेदीची तयारी सुरू केली आहे.

व्हिटीएम किट, रॅपीड अ‍ॅण्टिजेन किट, आरटीपीसीआर किट (RTPCR kit), बालकांसाठी बालकांसाठी लागणारे औषधी, विविध प्रकारच्या गोळया, व्हेंटिलेटर, बायपॅक मशिन, लहान व्हेटिलेटर, यंत्रसामुग्री आदींचा सामुग्री या दोन कोटींतून खरेदीचे नियोजन आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून उपलब्ध करुन द्यावा, याकरिता पालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com