Monday, April 29, 2024
HomeUncategorizedजी-२० परिषदेसाठी औरंगाबाद सज्ज!

जी-२० परिषदेसाठी औरंगाबाद सज्ज!

औरंगाबाद – aurangabad

मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० पारिषदेच्या (G-20 Council) अनुषंगाने करावयाच्या विविध विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारने महापालिकेला (Municipality) तब्बल ५० कोटींचा निधी दिला आहे. 

- Advertisement -

सर्वाधिक सुमारे ३० कोटींचा निधी हा येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या शिष्टमंडळ प्रवास करणार्‍या मार्गावर खर्च केला जाणार आहे. हे शिष्टमंडळ शहरात ज्या रस्त्यांवरून प्रवास करणार आहे, त्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच दुभाजक, फुटपाथ, चौक यांची दुरुस्ती व सुशोभीकरण, रोड फर्निचरच्या कामावर हा निधी खर्च केला जाणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील भिंती, पूल, उड्डाणपूल यांच्या रंगरंगोटीवर तब्बल ५ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

महापालिका प्रशासनाने जी-२० परिषदेच्या अनुषंगाने करावयाच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मनपा प्रशासक तथा आयुक्‍त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार, मनपा क्षेत्रात करावयाच्या विविध विकासकामांसाठी सनपा स्तरावर संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दिलेल्या अहवालाऱुसार विविध विकासकासे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांसाठी शासनाकडून मनपात विशेष बाब म्हणून ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या