खूशखबर... औरंगाबाद-पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासात!

औट्रम घाटात चौपदरी रस्ता
खूशखबर... औरंगाबाद-पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासात!

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद ते पुणे (Aurangabad to Pune) द्रुतगती मार्गाची घोषणा करीत या कामासाठी दहा हजार कोटींचा खर्च लागणार असून, रस्ता तयार झाल्यावर अवघ्या सव्वा तासात औरंगाबाद ते पुणे प्रवास शक्य होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात २०२४ पर्यंत २५ हजार कोटींची विविध कामे पूर्ण करू, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. जबिंदा लॉन्स येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ औरंगाबाद ते तेलवाडी या ३ हजार ६२ कोटींच्या प्रकल्पाचे तसेच नगरनाका ते केंब्रिज स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण यासह औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदीकरणाचे भूमिपूजन, दौलताबाद ते माळीवाडा, देवगाव रंगारी ते शिऊर यासह अन्य रस्त्यांचे भूमिपूजन झाले.

यावेळी (Union Minister of State for Railways Raosaheb Danve,) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) , रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, नारायण कुचे, एनएचएआयचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल, मुख्य अभियंता शेलार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बापूसाहेब साळुंखे आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद शहराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक अखंड पूल हवा का, अशी चर्चा वर्षभरापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी सुरू केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पाठपुरावा करत पुलासाठी तत्त्वत: मंजुरीही मिळवली. त्यानंतर काही शिष्टमंडळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटली आणि बाबा पेट्रोल पंप ते वाळूज किंवा चिकलठाणा ते वाळूज, नाहीतर चिकलठाणा ते बाबा पंप असा पूल होणार असल्याचे म्हटले जाऊ लागले. त्या सर्वांवर रविवारी (२४ एप्रिल) पडदा पडला. कारण दस्तुरखुद्द गडकरींनीच शेंद्रा डीएमआयसी ते वाळूज एमआयडीसी असा २५ किलोमीटर लांबीचा अखंड पूल होणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय मेट्रोसाठी दोन पूल होतील. पहिला चिकलठाणा ते क्रांती चौकमार्गे रेल्वेस्टेशन ९ किमी लांबीचा असेल. दुसरा रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंटमार्गे सिडको बसस्थानकापर्यंत १३ किमी लांबीचा असेल, अशी घोषणा त्यांनी केली.

जबिंदा लॉन येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिमोटद्वारे सोलापूर-धुळे रस्त्याचे लोकार्पण केले.

औरंगाबाद-पुणे रस्त्याची घोषणा करताच कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला. तो ऐकून गडकरी म्हणाले की, नव्या रस्त्याची अलाइनमेंट अंतिम झाली आहे. पुढील वेळी येईल तेव्हा या कामाचे भूमिपूजन करेन. चिकलठाणा येथून लातूर, सोलापूर, नागपूर, जळगाव, इंदूरला विमानसेवा गरजेची आहे.

औट्रम घाटात चौपदरी रस्ता

धुळे-सोलापूर (Dhule-Solapur) राष्ट्रीय महामार्ग औट्रम घाटात थबकला आहे. त्याविषयी गडकरी म्हणाले की, घाटात काही ठिकाणी वन खात्याच्या अडचणी आहेत. पूर्ण बोगद्यासाठी ५५०० कोटी लागतील. म्हणून काही ठिकाणी बोगदा, तर काही ठिकाणी चारपदरी रस्ता असा पर्याय असेल. चौसाळा, पाचोड, धारगाव, आडूळ, गेवराई, पांढरी आणि पिंपळगावातील अंतर्गत रस्ते एकाच वेळी विकसित केले जातील.

Related Stories

No stories found.