'बिबी का मकबरा' परिसरात आढळले मुघलकालीन 'स्वच्छतागृह'!

उत्खननाचे काम सुरूच राहणार  
'बिबी का मकबरा' परिसरात आढळले मुघलकालीन 'स्वच्छतागृह'!

औरंगाबाद - aurangabad

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात असलेल्या 'बिबी का मकबरा'जवळ जुन्या काळातील स्वच्छतागृहाचे (Toilet) अवशेष सापडले आहेत. हे स्वच्छतागृह मुघलकालीन असावे असा कयास पुरातत्व खात्याने बांधला असून त्यादृष्टीने आणखी उत्खनन केले जाणार आहे.

या कामासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या (Central Archaeological Department) औरंगाबाद येथील कायालयाने विशेष निधी प्राप्त झाला असून उत्खननाच्या कामाची निविदा प्रक्रिया या विभागाने सुरू केली आहे. बिबी का मकबरा'च्या बाजूने रस्त्यावरून औरंगाबाद जाताना डाव्या बाजूला बांधकाम साहित्याचा मलबा आणि कचऱ्याचे ढीग साचले होते. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केल्यावर याठिकाणी जुन्या काळातील काही वास्तू सापडू शकतात, असे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी या विभागाच्या माध्यमातून उत्खननाचे काम हाती घेण्यात आले. परंतु, त्यावेळी या कामासाठी केवळ दीड लाख रुपयांची तरतूद होती. त्यामुळे उत्खननाचे काम जेमतेम होऊ शकते.

या कामात जुन्या काळातील स्वच्छतागृह सापडले. हे स्वच्छतागृह मुघलकालीन असावे असे बोलले जात आहे. याबद्दल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाचे प्रमुख मिलन कुमार चावले यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, 'त्याठिकाणी जुन्या काळातील वास्तूंचे अवशेष सापडू शकतात असे लक्षात आल्यावर आम्ही चार-पाच महिन्यांपूर्वी उत्खननाचे काम सुरू केले. त्यासाठी ३६ बाय ३६ मीटर आकाराचे तीन खड्डे करण्यात आले होते. उत्खननाचे काम करताना जुन्या काळातील स्वच्छतागृह सापडले आहे.'

बिबी का मकबरा' परिसरात सापडलेले स्वच्छतागृह. जुन्या काळातील आहे. मुघलकाळातील ते असावे असे वाटते. उत्खननाचे काम पूर्ण झाल्यावर त्या स्वच्छतागृहे पुरातत्व विभाग जतन करील. त्या काळातील स्वच्छतागृह कसे होते, ते पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com