Friday, April 26, 2024
HomeUncategorizedब्राह्मण महासंघ लढवणार औरंगाबाद महापालिका निवडणूक

ब्राह्मण महासंघ लढवणार औरंगाबाद महापालिका निवडणूक

औरंगाबाद – aurangabad

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने यंदाची होवू घातलेली औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक (Aurangabad Municipal Corporation Election) लढवणार असल्याचे शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष सुधीर नाईक (Sudhir Naik) यांनी जाहीर केले.

- Advertisement -

नाईक पुढे म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाने कायम ब्राह्मण समाजाच्या फक्त मतदानापुरता वापर केला आहे. सत्तेमध्ये कधीही हक्काचा वाटा दिलेला नाही. आता असे होणार नाही. आता आम्ही शहरातील नगरसेवक (Corporator) (वार्ड) सदस्याची निवडणूक लढवणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाने जर त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला तर तेथे आम्ही आमचा उमेदवार उभा करणार नाही. परंतु जेथे आमची मोठी ताकद आहे, तेथे आम्ही मात्र आमचे उमेदवार उभे करणार यात मात्र शंका नसल्याचे गारखेडा येथील झालेल्या बैठकीत जाहीर केले. शहरात मनपासाठी १० ते १५ उमेदवार आम्ही उभे करणार असल्याचे देखील नाईक यांनी जाहीर केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शुक्रवारी गारखेडा येथे औरंगाबाद विभागीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत ८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन, भगवान परशुराम जन्मोत्सव, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आगामी येवू घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्राबल्य असणाऱ्या वार्डामधून अंदाजे १० ते १५ उमेदवार ताकदीनिशी उभे करणार. आमच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेद चा उपयोग करुन समाजातील नगरसेवक निवडून आणण्यावर भर असणार असल्याचे देखील सांगितले. शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांना सोबत घेणार आहोत. या सर्व संघटनांची एक समन्वय समिती तयार करणार आहोत. या बाबत सर्व संघटना बरोबर एक मोठी बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आमची दिशा ठरणार आहोत. याची एक कोअर कमिटी तयार करणार आहोत. यानंतर पुढील दिशा ठरवणार आहोत. अश्या पद्धतीने हे काम चालणार आहे.

यावेळी महासंघाच्या वतीने कोरोना, लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व समाजाला केलेल्या मदतीबाबतच्या माहिती देखील सांगितली. बैठकीला महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक, सुचेता पालोदकर, किरण शर्मा, स्मिता जोशी, गायत्री न्यायाधिश, अंजली गोरे, सुहास ठोसर, प्रकाश महाजन, प्रमोद डिग्रसकर, हेमंत पालकर, धनंजय ब्रह्मपूरकर, अजिंक्य कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, सीमा नांदापूरकर, संजय टोनपे, रश्मी ढापरे, नागनाथ जोशी, आंनद देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, रितेश दीक्षित, कालिदास त्रिवेदी, सुभाष जोशी, कुणाल वैद्य, विनय देशपांडेसह समाजातील सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या