Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये उभारता येतील १६ मजली इमारती

औरंगाबादमध्ये उभारता येतील १६ मजली इमारती

औरंगाबाद – aurangabad

पर्यटनाची (tourism) राजधानी म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहर आता (towers city) टॉवर्सचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. (cunicipal corporation) महापालिकेने शहरात ४८ मीटर (१६ मजली) उंचीपर्यंतच्या इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत उंच इमारती उभ्या राहिलेल्या दिसून येतील.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचा चेहरामोहरा विविध विकास कामांमुळे बदलू लागला आहे. रस्त्यांची अवस्था सुधारली, कचऱ्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला, दिवाबत्तीबद्दलच्या समस्या कमी झाल्या आहेत. पाणी पुरवठ्याची समस्या मात्र कायम आहे.

पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असल्यामुळे पाण्याचा प्रश्न येत्या तीन-चार वर्षांत सुटेल असे मानले जात आहे. विविध विकास कामे होत असतानाच राज्याच्या नगर विकास विभागाने नवीन विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली, या नियमावलीनुसार मोठ्या शहरांमध्ये ७९ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना परवानगी देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरासाठी देखील हे लागू करण्यात आले आहे. सत्तर मीटर उंची पर्यंतच्या इमारतींना परवानगी देण्याचे अधिकार विकास नियंत्रण नियमावलीनुसार महापालिकेला आहेत. म्हणजे शहरात किमान १६ मजली इमारती उभारण्याचा मार्ग नगर विकास विभागाच्या निर्णयामु‌ळे मोकळा झाला आहे, परंतु शहराशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून एवढ्या उंचीच्या इमारतीसाठी पालिकेकडून बांधकाम परवानगी घेण्यासाठी पुढाकार घेतला जात नव्हता, परंतु आता काही बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेत पालिकेकडून उंच इमारतींसाठी बांधकाम परवानगी घेतली आहे.

महापालिकेच्या नगर रचना (Town Planning Department) विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी याबद्दल माहिती दिली. सत्तर मीटर उंचीची इमारत बांधण्यासाठी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाने पालिकेकडून बांधकाम परवानगी अद्याप घेतली नसली तरी ४८ मीटर (१६ मजली) उंचीची इमारत बांधण्यासाठी काही व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे.त्याशिवाय ३५, ३६ मीटर (११ आणि १२ मजली) उंचीच्या इमारतीच्या बांधकामासाठीदेखील परवानगी देण्यात आली आहे. बांधकाम परवानगी देण्यात आलेल्या इमारती ‘सिंगल टॉवर’ इमारती आहेत. त्यामुळे या इमारतींचे बांधकाम लवकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या