
औरंगाबाद - aurangabad
(Municipal Corporation) महापालिकेने (Smart City) स्मार्ट सिटीच्या माध्यमातून यासाठी (Water) जल बेल हे मोबाईल ॲप (Mobile app) तयार केले आहे. सध्या सिडको एन-५ या जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणार्या सुमारे ३० वॉर्डामधील नागरिकांना या ॲपचा लाभ मिळत आहे. मात्र आता या ॲपची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. लवकरच एन-७ व जय विश्वभारती कॉलनी येथील जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणाऱ्या ४० वॉर्डामधील नागरिकांनाही या ॲपद्वारे पाण्याची रोजची माहिती मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र आता शहरातील कोणत्या वॉर्डात केव्हा पाणी येणार? किती वेळ पाणी येणार? याची रोजची अपडेट माहिती नागरिकांना मेसेजद्रारे उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटीचे तांत्रिक विभागाचे प्रमुख फैज अली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाण्याची निश्चित वेळ कळावी, पाणीपुरवठ्याची वेळ बदलली असेल तर त्याचे कारण कळावे, तसेच पाणीपुरवठ्या संदर्भातील नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोचाव्यात, यासाठी तयार केलेल्या जल बेल अँपचा उपयोग सध्या केवळ एन-५ येथील जलकुंभावरुन पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वसाहतींमधील नागरिकांना मिळतो.
या जलकुंभावरुन परिसरातील ३० वॉर्डांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंबंधी २३० टप्प्यांच्या नियोजनाबाबतचे नोटीफिकेशन मिळते. ऍपमुळे नागरीकांना पाण्याबाबतचे नियोजन करता येणे शक्य होत आहे,. त्यामळे आता जलबेल ऍप एन-७ तसेच जय विश्वभारती कॉलनीच्या जलकुंभाला कव्हर करण्यात येणार आहे. यामाध्यमातून ४० वार्डांमधील पाण्याचे नोटीफिकेशन नागरिकांना मिळणार आहे, या माध्यमातून जवळपास तीनशे टप्प्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही फैज अली यांनी स्पष्ट केले.