Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedरस्त्यांवर सव्वापाचशे कोटींचा खर्च 

रस्त्यांवर सव्वापाचशे कोटींचा खर्च 

औरंगाबाद- Aurangabad

शहरात वर्षभरात तब्बल ५१७ कोटी रुपयांचे रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या बाबतीतील शहराचा अनुशेष भरुन निघेल असे मानले जात आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या निधीतून पावणेतीनशे कोटींच्या रस्त्यांची कामे झालेली आहेत.

- Advertisement -

शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली होती. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची स्थिती दयनीय झाली होती. महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे रस्त्यांची कामे केली जात नव्हती. नागरिकांकडून फारच ओरड झाल्यास पॅचवर्कची कामे केली जात होती. त्यावर वर्षाकाठी पाच ते सहा कोटी रुपये खर्च केले जात होते.

शहरातील रस्त्यांची समस्या काही प्रमाणात सोडवण्यासाठी राज्य शासनाने २०१४-१५ च्या सुमारास २५ कोटींचा निधी दिला. त्यानंतर शंभर कोटींचा विशेष निधी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आली. यातून सुमारे ३७ रस्त्यांची कामे करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी पुन्हा १५२ कोटींचा निधी रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने जाहीर केला. पण या निधीतील कामे महापालिका (Municipal Corporation), एमआयडीसी (MIDC) आणि रस्ते विकास महामंडळ (Road Development Corporation) यांच्यात वाटून देण्यात आली. १५२ कोटींच्या निधीतून तीस रस्त्यांची कामे करण्यात आली.

शासनाकडून मिळालेल्या निधीतून महापालिकेने (Municipal Corporation) शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यात आली. अंतर्गत रस्त्यांची समस्या मात्र कायम राहिली. या रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेने ३१७ कोटींचा प्रस्ताव तयार केला. तांत्रिक मान्यतेसह हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवण्यात आला.

परंतु राज्य शासनाकडून निधीची तरतूद अपेक्षित वेळेत झाली नाही. त्यामुळे ३१७ कोटींची रस्त्यांची कामे स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कॉर्पोरेशनच्या (Smart City Development Corporation) माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय दोनशे कोटींची रस्त्यांची कामे महापालिका निधीतून केली जाणार आहेत. ३१७ आणि दोनशे कोटी अशी एकूण ५१७ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. कंत्राटदारांना वर्कऑर्डर दिल्यानंतर नऊ महिन्यात रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या