Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedकर वसुलीने औरंगाबाद महापालिका 'मालामाल'!

कर वसुलीने औरंगाबाद महापालिका ‘मालामाल’!

औरंगाबाद – aurangabad

महापालिकेने (Municipal Corporation) नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (Property tax) मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून विक्रमी वसुली केली आहे. कर वसुलीचा १६७ कोटी १८ लाखांचा टप्पा महापालिकेने गाठला आहे. १९८८ पासून आतापर्यंतच्या इतिहासात महाापालिकेची ही सर्वांत जास्त करवसुली मानली जात आहे.

- Advertisement -

कोरोना (corona) संसर्गामुळे महापालिकेच्या कर वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. कर वसुलीचा आलेख वर-खाली होत होता. कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्यावर पालिका प्रशासनाने (Municipal administration) कर वसुलीवर लक्ष देण्याचे ठरविले. यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Administrator Astik Kumar Pandey) यांनी कर वसुलीसाठीचे नियोजन करून दिले. उपायुक्त अपर्णा थेटे (Deputy Commissioner Aparna Thete) यांच्यावर कर वसुलीची जबाबदारी देण्यात आली. (Special Task Force) स्पेशल टास्क फोर्सची स्थापना देखील करण्यात आली. प्रत्येक झोन कार्यालयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून २०२१-२२ या आर्थिक वर्षात १६७ कोटी १८ लाख रुपयांची करवसुली झाली. त्यात मालमत्ता कराची १२९ कोटी ६४ लाख रुपये, तर पाणीपट्टीची ३७ कोटी ५४ लाख वसुलीचा समावेश आहे.

कर वसुलीमध्ये झोन क्रमांक सातने यंदा बाजी मारली आहे. या झोन कार्यालयाने २९ कोटी ९० लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. झोन क्रमांक नऊने २७ कोटी २६ लाख रुपयांचा कर वसूल केला. झोन क्रमांक आठने २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या कराची वसुली केली. झोन क्रमांक पाचने २२ कोटी ९९ लाख रुपयांची वसुली केली आहे. झोन क्रमांक एकने १५ कोटी ४९ लाख रुपये, झोन क्रमांक चारने १४ कोटी ७२ लाख रुपये, झोन क्रमांक सहाने १३ कोटी ७३ लाख रुपये, झोन क्रमांक दोनने १३ कोटी ७२ लाख रुपयांचा कर वसूल केला. सर्वांत कमी कर वसुली झोन क्रमांक तीनने केली आहे. या झोन कार्यालयाच्या माध्यमातून सहा कोटी चार लाख रुपये वसूल झाले आहेत.

कर वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांनी कामाच्या पद्धतीत बदल केले. कर भरण्यासाठी नागरिकांना सुविधा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. धनादेश अनादार प्रकरणी तातडीने कारवाई केली जाऊ लागली. तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. जास्तीत जास्त डिमांड नोटचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याचा सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा कर वसुलीचे प्रमाण वाढल्याचे मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या