औरंगाबाद मनपाने पुन्हा मागवले 10 हजार रेमडेसिवीर

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले
औरंगाबाद मनपाने पुन्हा मागवले 10 हजार रेमडेसिवीर

औरंगाबाद - Aurangabad

शहरात गंभीर कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद शहरात मात्र इंजेक्शनचा मुबलक साठा होता. मात्र आता हे इंजेक्शन संपले आहेत. त्यामुळे आणखी 10 हजार इंजेक्शन मागविल्याचे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

Title Name
औरंगाबाद शहरात येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
औरंगाबाद मनपाने पुन्हा मागवले 10 हजार रेमडेसिवीर

पालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असून त्यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक निघत आहे. त्यामुळे पालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर वाढला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता पालिकेने यापूर्वीच पालिकेने 10 हजार इंजेक्शन खरेदी केले होते. मात्र शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी पालिकेने इंजेक्शन दिले. त्यामुळे आता पालिकेकडील साठा देखील संपत आला आहे. त्यामुळे आणखी 10 हजार इंजेक्शनची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे. त्यातील आवश्यक साठा लवकरच मिळेल. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील 15 हजार इंजेक्शनची मागणी केल्याची माहिती आयुक्त पांडेय यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com