औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणतात 'परिस्थिती नियंत्रणात'!

औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणतात 'परिस्थिती नियंत्रणात'!

ग्रामीण भागापेक्षा शहरात कमी रुग्ण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहराची कोरोना संसर्गाची परिस्थिती तणावाची जाणवत असली तरी नियंत्रणात आहे. कोरोनाबाधितांमध्ये महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेने कमी आहे, असा दावा पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी रविवारी केला.

औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पांडेय म्हणाले की, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार करता परिस्थिती नियंत्रणात आहे. अलीकडे ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढते आहे. शिवाय मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत तसेच बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, नाशिक या भागातील गंभीर रुग्ण देखील उपचारासाठी औरंगाबादेत येत आहेत, त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर काही प्रमाणात ताण पडत आहे. तरीही प्रत्येकाचया उपचारासाठी आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर प्रभावी ठरले आहे. आजवर येथून सात हजारावर रुग्णांनी उपचार घेतले आहे. आपण स्वत: मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्येच उपचार घेतल्याचा उल्लेखही पांडेय यांनी केला.

आणखी दहा हजार रेमडेसिवीर मागवले : पालिकेकडे रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक आहे. तसेच आणखी दहा हजार इंजेक्शनची मागणी नोंदवली आहे, हे स्पष्ट करताना पांडेय म्हणाले की, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याची पुरेपुर खबरदारी प्रशासन घेत आहे. त्यासाठी 500 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पालिका खरेदी करणार आहे. विविध कोविड केअर सेंटरमध्ये मिळून एक हजार खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com