Friday, April 26, 2024
HomeUncategorizedगोवरच्या धसक्याने औरंगाबाद महापालिका अलर्ट!

गोवरच्या धसक्याने औरंगाबाद महापालिका अलर्ट!

औरंगाबाद Aurangabad

राज्यात काही ठिकाणी गोवर साथ (accompanied measles) असल्याचे समोर आल्याने शहरात गोवरची साथ पसरू नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Municipal Health Department) सर्वेक्षण (Survey) केले जात आहे. यात गोवरची पहिली (Measles vaccine) लस न घेतलेले १३१ तर दुसरी लस न घेतलेले १७७ अशी एकूण ३०८ बालके आढळून आली. यातील २३८ बालकांना गोवर लस देण्यात आली आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जी-२० परिषदेसाठी ३५ इव्ही बसेसची ऑर्डर

मुंबईसह काही भागात लहान बालकांच्या गोवर साथीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. राज्यातील इतर शहरांसह ग्रामीण भागात गोवर साथीची लागण होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना राबविण्यात येत आहे.

औरंगाबादमधील रिक्षा चालकांना लागणार शिस्त!

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून गोवर रुबेला लस न घेतलेल्या बालकांची शोध मोहीम घेतली आहे. यामध्ये लसीची पहिली मात्रा न घेतलेले १३१ तर दुसरी मात्रा न घेतलेली १७७ बालके आढळून आली. त्यापैकी आरोग्य पथकाने तातडीने ९६ बालकांना लसीची पहिली मात्रा व १४२ बालकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आले तर तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात व बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. 

गोवर या आजाराचा प्रतिबंध करण्याकरिता बालकास न चुकता गोवर रुबेला लसीच्या दोन मात्रा योग्य वेळेत देण्यात याव्यात. मनपा आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालये, घाटी तसेच एमजीएम रुग्णालयात गोवर रुबेलाची लस व इतर सर्व लसी मोफत देण्यात येतील, असे विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या